परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
दै. महाराष्ट्र प्रतिमाच्या "नशाविरोधी"वृत्त मालिकेला मोठे यश
पोलिस उपअधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या पथकाची मोठी करवाई ; लाखोंचा गांजा जप्त
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातील रेल्वे स्थानक शेजारीनअसलेल्या इराणी गल्लीमधील एका घरातून अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने छापा टाकत गांज्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत लाखोंच्या गांजासह मोटारसायकल ऐवज जप्त करण्यात आला आहे.
परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी गल्लीमध्ये एका घरात गांजा असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे व पोलिसांच्या टीमला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इराणी गल्लीतील घरात छापा केला असता या ठिकाणी 51 किलो गांजा व काही मोटारसायकली आढळून आल्या.
सदरील छाप्या बाबत बातमी लिखाण करे पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली असून रविवार दि 31 रोजी याच परिसरात असलेल्या रेल्वे स्थानकावरून चिमुकल्या मुलीस आमिष दाखवून अमानुष अत्याचार केल्याची घटनेने स्थानक परिसरात अवैध धंदे बोकाळली असल्याचे उजेडात आले होते.
परळी मार्गे अनेक रेल्वे गाड्या मार्गस्थ होत असून या ठिकाणी 24 तास वर्दळ असून रात्री-अपरात्री अनेक प्रवाशांची वर्दळ सुरू असते. या सर्व गोष्टीचा फायदा या परिसरात असलेली नशेडी मंडळी घेत असून वेगवेगळ्या प्रकारची नशा करून पाकीट चोरी करणे, दमदाटी करणे, मोबाईल चोरी करणे, एकट्या प्रवाशांवर पाळत ठेऊन लूट करणे असे अनेक प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर आल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी पथक, भरोसा सेल पथक अंबाजोगाई, फॉरेन्सिक पथक बीड आणि संभाजी नगर, शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा