परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ना.पंकजा मुंडे उद्या घेणार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
जिल्हयातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा घेणार आढावा
बीड।दिनांक २०।
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे उद्या रविवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असून या बैठकीत जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
ना. पंकजाताई मुंडे उद्या बीड शहरात येत आहेत. सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन व सर्व संबधित अधिकाऱ्यांसमवेत त्या बैठक घेणार आहेत. आष्टी, शिरूर, पाटोदा, गेवराई, माजलगांव तसेच अन्य तालुक्यात नुकतीच जोरदार अतिवृष्टी झाली, यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तसेच जिवीत व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे, अनेकांचे संसार उघडय़ावर आले, यात सर्व नुकसानीचा आढावा ना. पंकजाताई उद्याच्या बैठकीत प्रशासनाकडून घेणार आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा