हैवानाला फाशीच द्या: सकल मुस्लिम समाजही सरसावला!

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या हैवानाला चार दिवसाची पोलीस कोठडी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी-

    परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकात दि. 31 रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेत केवळ वय सहा वर्षै असलेल्या पंढरपूर येथील एका चिमुकलीवर रेल्वे स्थानकातून उचलून नेऊन अघोरी पद्धतीने अतिशय क्रुरपणे लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणातील परळी येथील बरकत नगर भागातील 27 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या आरोपीला आज अंबाजोगाईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.या प्रकरणात या आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


परळीतील लहान मुलीवर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाज आक्रमक !



 सकल मुस्लिम समाज परळीच्या वतीने संभाजीनगर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. ३ सप्टेंबरला परळी बंदचे आवाहन  करण्यात आले आहे त्याला सकल मुस्लिम समाज परळीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.जी घटना घडली आहे त्या केसला फास्टट्रॅक कोर्टात चालवावे आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी,परळी रेल्वे पोलिसांनी यापुढे रेल्वे परिसरात आपली सुरक्षा वाढवावी आणि रेल्वे स्थानक परिसरात जे नशेडी बसत आहे त्यांच्यावर ही रेल्वे पोलिसांनी कारवाई करावी, शहरात अनेक ठिकाणी गुटखा,गांजा आणि अनेक अंमली पदार्थ विकणाऱ्यावर ही कारवाई करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी मुफ्ती अश्फाक साहेब, नजीर अहेमद सर, गफ्फार शाह,साजेद बबलु,जुबेर भाई बाबा,बदर भाई,शहेरयार सय्यद सह अनेक परळीतील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !