परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ना. पंकजा मुंडे श्रीक्षेत्र माहूरगडावर ; रेणुकामातेचे घेतले दर्शन
देवस्थान संस्थानच्या वतीनं जोरदार स्वागत
परळी वैजनाथ ।दिनांक २२।
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर जाऊन रेणुकामातेचे दर्शन घेतले. संस्थानच्या वतीनं यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं.
शारदीय नवरात्रोत्सवास आज सुरवात झाली. जिल्ह्यातील दौरा आटोपून ना. पंकजाताई मुंडे सकाळी परळी येथून श्रीक्षेत्र माहूरकडे रवाना झाल्या. दुपारी त्यांनी माहूरगडावरील श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचं हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं. तत्पूर्वी माहूर शहरात आगमन होताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा