परळी तालुक्यातील डाबी गावाजवळ घडला प्रकार

खळबळजनक:आखाड्यावर गृहिणीचा घरातच आढळला शस्त्राने घाव असलेला मृतदेह




परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      परळी तालुक्यातील डाबी येथील रहिवासी व गावाजवळच्या शेतातील घरात आखाड्यावर एका गृहिणीचा शस्त्राने घाव असलेला रक्तरंजित मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर शास्त्राने वार झालेल्या जखमा दिसत असल्याने या महिलेची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली मात्र या प्रकरणात अद्याप फिर्याद देण्यास कोणीच पुढे आलेले नाही त्यामुळे याप्रकरणी पोलिसांमध्ये कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

         डाबी या गावाजवळ राखेचे तळे असुन या तळ्याशेजारील शेतात तुकाराम मुंडे यांचे कुटुंब आखाड्यावर राहते. आज सकाळच्या सुमारास या आखाड्यावरील घरामध्ये तुकाराम मुंडे यांची पत्नी शोभा तुकाराम मुंडे (वय अंदाजे 36) या महिलेचा धारधार शस्त्रांचे घाव व  जखमांचे व्रण असलेला मृतदेह आढळून आला. त्यामुळे तिचा घात झाला असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली. त्याअनुषंगाने परळी ग्रामीण पोलिसांना ही बाब कळल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी स्थळ पाहणी करून जागेचा पंचनामा केला आहे. मात्र या प्रकरणी काही काळ नातेवाईक व नागरिकांनी आरोपीचा शोध घ्यावा त्यानंतरच मृतदेह जागेवरून हलवावा  अशा प्रकारची भूमिका घेतली. दरम्यान या महिलेचा पती गायब असुन पती-पत्नीतील वादातून हा प्रकार घडला असेल का? याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र ठामपणे अद्याप याप्रकरणी कोणीही पतीनेच ही हत्या केल्याचे सहज बोलण्यातूनही म्हटलेले नाही किंवा तशी फिर्यादही कोणी दिलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी गुढ वाढलेले असुन नेमका हा हत्येचा प्रकार आहे का? पती-पत्नीत जुने वाद असल्याचे काही नातेवाईक म्हणत आहेत. मात्र एक दीड वर्षांपूर्वीच हे वाद मिटून पुन्हा सुखाने ते संसार करत असल्याचेही काहीजण म्हणत आहेत. मात्र तरीही या घातपाताच्या प्रकारात गायब असलेला पती असू शकतो अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. मात्र मयत महिलेच्या नातेवाईकां पैकी कोणीही अद्याप पोलिसांकडे अधिकृत फिर्याद दिलेली नाही. दरम्यान ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !