अखिल विश्वाचे विश्वगुरु भगवान दत्तात्रेय -ह.भ.प. दत्तात्रय महाराज आंधळे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी )परळी शिवाजी नगर माजी सभापती भास्करराव चाटे मामा यांच्या निवासस्थानी त्रिदिवशीय दत्तात्रेय भगवान यांचे कथा चरित्र प्रसंग व्यक्त करतांना दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या मधुर आवाजात प्रसंग व्यक्त करतांना दत्तात्रय महाराज बोलतांना म्हणाले
दत्तात्रेय भगवान हे स्मृतगामी आहेत.संपूर्ण विश्वाचे विश्वगुरु केवळ भगवान दत्तात्रेय हेच आहेत असे निक्षून प्रतिपादन ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.
पितृपक्षात निमित्ताने श्री भास्करमामा चाटे यांनी त्रिदिवशीय "श्रीदत्तकथा"आयोजित केली असून आज दत्त जन्म कथन केले.
यावेळीआज कथेत रेणुका माता जमदाग्नी तसेच सहस्त्र अर्जुन व परशुराम हे आख्यान आज सांगुन दत्त जन्म करण्यात आला. दत्त जन्माचा पाळणा म्हणण्यात आला. या कथेला उपस्थित ह भ प भरत महाराज जोगी, डॉक्टर अरुण गुटेसाहेब, ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे,थोंटे अप्पा, शिवरत्न मुंडे, पाटलोबा मुंडे, दत्तात्रय ढवळे, श्री प्रल्हाद शेळके,बीडगर साहेब,फड, दत्त कथेला साथसंगत ह.भ.प.अमोल महाराज गुट्टे, श्री सुरेश महाराज मोगरे,श्री अच्युत महाराज गुट्टे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा