परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला नुकसानीचा आढावा

अतिवृष्टीमुळे बाधित झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या



ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला नुकसानीचा आढावा

बीड।दिनांक२१।

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अथवा पुरांमुळे बाधित झालेला एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज आढावा बैठकीत बोलतांना केली.

        जिल्हयात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे तसेच जिवीत व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, यासंदर्भात झालेले नुकसान व पंचनाम्याची सद्यस्थिती याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ना. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान तसेच सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    ना. पंकजा मुंडे यांनी बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती जाणून घेतली जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी जिल्ह्यात  १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती सादर केली. त्यामध्ये शेती पिक नुकसान, मनुष्य मृत्यु जनावरे मृत्यु याबाबतचा तालुकानिहाय आढावा सादर केला.

मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये

बैठकीत प्रशासनाला सूचना करताना ना. पंकजाताई म्हणाल्या, शेत पिक नुकसान पंचनामा करताना ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही, परंतू शेती पिकांचे नुकसान आहे त्या ठिकाणचे सविस्तर पंचनामा सर्व्हे करुन अहवाल शासनास सादर करावा, जमीन खरडून गेलेल्या क्षेत्राचे वस्तुनिष्ठ व अचूक पंचनामा करुन एकही बाधीत शेतकरी वंचित राहणार याची दक्षता घ्यावी,जनावरे मृत्यू झालेल्या प्रकरणी (वाहून गेलेल्या) त्यांचे इअर टॅगिंग क्रमांक किंवा खरेदी पावती किंवा दवाखान्यामध्ये नेलेली नोंद याचा वापर करुन मदत देण्याची कार्यवाही करावी, बुजलेल्या/पडलेल्या/खचलेल्या विहीरींचे पंचनामे करुन सविस्तर अहवाल शासनास सादर करावा.ज्या पुलांची उंची कमी आहे त्यांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव व वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सर्व्हे करुन शासनास आठ दिवसात सादर करावा असे आदेश त्यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!