परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

संवेदनशील परळीकरांचा अन्यायाविरुद्ध लढावू बाणा !

पहा:ही आहे खरी परळीची संस्कृती व वृत्ती - लेकीच्या न्यायासाठी अन् हैवानी वृत्तीला ठेचण्यासाठी अख्खी परळी रस्त्यावर!




भक्कम आधार: पीडितेच्या कुटुंबाला परळीकरांनी चालत, चालत जमा करून दिले 85 हजार रुपये !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     परळी रेल्वे स्थानकात दिनांक 31 रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. पंढरपूरच्या कुटुंबातील एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. याप्रकरणी परळीकरांनी आज(दि.३) एकजुटीने वज्रमूठ दाखवत कडकडीत बंद पाळला.तसेच लाखोच्या संख्येने मूक मोर्चात सहभागी होऊन याबाबतचा निषेध नोंदवला.एवढेच नाही तर पिडित कुटुंबाला ८५ हजारांचा निधीही सुपूर्द केला आहे.

      पंढरपूर येथील एका मजूर कुटुंबावर परळीच्या रेल्वेस्थानकावर अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वेळ आली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आपल्या परळीत घडली याची सल प्रत्येक संवेदनशील, सजग आणि सातत्याने अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा असलेल्या तमाम परळीकरांच्या मनाला खटकली. चिमुकली वरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील हैवानाला फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे या मागणीसाठी उस्फूर्तपणाने बंद पाळून ना जात ना धर्म ना पंथ असा कुठलाही भेदभाव न ठेवता एकजुटीने अख्खी परळी या लेकीच्या न्यायासाठी आणि हैवानी वृत्तीला वेळीच ठेचण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे परळीकरांच्या संवेदनशीलतेचे व सकारात्मकतेचे चित्र आज परळीत बघायला मिळाले. अठरापगड जाती,धर्मातील परळीकर केवळ निषेध नोंदवण्यासाठीच रस्त्यावर उतरले नाहीत तर पीडीतेचे पुनर्वसन व्हावे यासाठी गरजवंत असलेल्या या कुटुंबाला मोठा आधार देण्याचे कामही परळीकरांच्या माध्यमातून करण्यात आले. या पिडीतेच्या कुटुंबाला भरभक्कम आर्थिक आधार मिळावा यासाठी पै-पै जमा करण्यात आली. यात तब्बल 85 हजार रुपये आज घडीला या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले.

     रेल्वे स्थानकात घडलेल्या चिमुकली वरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी परळीत सर्व स्तरातून सुरुवातीपासूनच संताप व्यक्त केला जात होता. प्रभु वैद्यनाथाच्या पवित्र भूमीत अशा प्रकारचे कृत्य करणारी हैवानी वृत्ती निपजत असेल तर याला वेळीच ठेचले पाहिजे यासाठी आणि अशा नीच वृत्तीच्या विरोधात संवेदनशील व सकारात्मक वृत्ती असलेल्या परळीकरांनी एकत्रित येत उत्स्फूर्तपणाने आज दिवसभर कडकडीत बंद पाळला. राणी लक्ष्मीबाई टाॅवर पासून निषेध मूक मोर्चाला सुरुवात झाली. हा निषेध मूक मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून रेल्वे स्थानकापर्यंत गेला. या मूक मोर्चात परळी शहरातील सर्व स्तरातील, सर्व जाती- धर्मातील, विविध सामाजिक संघटना, संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या मूक मोर्चामध्ये महिलांनी उस्फुर्त सहभाग घेत या हैवानाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे ही लक्ष वेधत सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जी करण्यात आलेल्या आरपीएफ व रेल्वे पोलीस यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन निदर्शने करून देण्यात आले.

रेल्वे स्थानक परिसरात आढळलेल्या बेवड्याला दिला चोप

दरम्यान, हा मूक मोर्चा रेल्वे स्थानकाच्या परिसरात असतानाच याच परिसरात दारूच्या नशेत असलेला एक बेवडा या परिसरात दबा धरून बसलेला होता. काही मोर्चेकरी महिलांच्या ही बाब निदर्शनास आली. या महिलांनी त्याला हटकले. त्यावेळी त्याने महिलांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता अशा प्रकारच्या नशेडी व बेवड्यांमुळेच रेल्वे स्थानक परिसरात अत्याचाराच्या अशा घटना घडतात या भावनेतून या महिलांनी जागेवरच चपला काढत या बेवड्याला चांगलाच चोप दिला. त्याचबरोबर अन्य मोर्चेकरांनी ही बाब पोलीस प्रशासन व उपस्थित असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील नशेड्यांच्या विळख्यात असलेला परिसर व आज मोर्चाच्या वेळीच प्रत्यक्ष निदर्शनास आलेले उदाहरण यामुळे आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने बघणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.


 पीडित कुटुंबाला 85 हजार रुपयांची आर्थिक मदत....

     दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्टट्रॅक वर प्रकरण चालले पाहिजे, आरपीएफच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे या मागण्यांसाठी केवळ बंद पाळून व निदर्शने करून निषेध न करता प्रत्यक्ष पिडितेला आधार देण्यासाठी तमाम परळीकर संवेदनशील असल्याचेही उदाहरण बघायला मिळाले. या मूकमोर्चाच्या अनुषंगाने  मूक मोर्चात चालत चालत आर्थिक मदत निधी उभा करण्यात आला. यामध्ये तब्बल 85 हजार रुपये जमा झाले. 85 हजार रुपयांचा हा आर्थिक निधी पीडित कुटुंबाच्या हातात सुपूर्द करण्यात आला.

ही आहे खरी परळीची संस्कृती व वृत्ती... 

           दरम्यान या अन्यायकारक व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या माध्यमातून सर्व स्तरातून घटना घडल्यापासूनच संताप व चीड ही तमाम परळीकरांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवते. त्याचबरोबर बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचा अन्याय आपल्या भूमीत होऊ नये ही भावना तमाम परळीकरांची असल्याचेही अधोरेखित झाले. त्याचप्रमाणे या लेकीसाठी जात, धर्म, पंथ याच्या कोणत्या मर्यादा आडव्या आल्या नाही.सर्वांनी एकजुटीने व ताकदीने या पीडित कुटुंबाच्या पाठीशी आपला भरभक्कम आधार उभा केला. केवळ निषेधच नाही तर या पिडित कुटुंबाला व पिडितेचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा आर्थिक निधी उभा करण्याचे सामाजिक भानही याच परळीकरांमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे उठ सूट कोणत्याही कारणाने परळीची प्रतिमा खलनायकी करुन  कांगावा करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक या माध्यमातून परळीकरांनी दिली आणि  ही पहा ही आहे खरी परळीची वृत्ती हेच दाखवून दिल्याचे दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!