डॉ.किरण पारगावकर यांच्यावतीने सत्कार
वैद्यनाथ बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा हृदय सत्कार
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
दि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा डॉ. किरण पारगावकर यांच्या वतीने ह्रद्य सत्कार करण्यात आला.
डॉ. किरण पारगावकर यांच्या निवासस्थानी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँकेचे चेअरमन विनोद सामत यांच्यासह सर्व संचालकांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. किरण पारगावकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा