परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती....

परळीत संत -महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत "बाजीराव पेट्रोलियम" या अत्याधुनिक पेट्रोल पंपाचा शनिवारी होणार शुभारंभ

प.पु. महादेव  महाराज चाकरवाडीकर, प.पु. आमृताश्रम स्वामी, प.पु. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – 

        परळी शहराच्या सेवा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारा अत्याधुनिक असा "बाजीराव पेट्रोलियम" या नवीन  पेट्रोल पंपाचे येत्या शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३१ वाजता संत,महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.


    ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर पासून काही अंतरावरच परळी ते नंदगौळ–पुस-बर्दापूर रोडवर, श्रद्धानंद गुरुकुल आश्रमासमोर  उभारण्यात आलेल्या बाजीराव पेट्रोलियम या भारत पेट्रोलियमच्या अत्याधुनिक पंपावर २४ तास इंधन सेवा उपलब्ध राहणार असून ग्राहकांसाठी सर्व आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या पेट्रोल पंपाचा शुभारंभ  राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. उद्घाटन प्रसंगी शांतिब्रह्म गुरुवर्य ह.भ.प.प. पू.महादेव महाराज चाकरवाडीकर, धर्मगुरू प.पू.अमृताश्रम स्वामी आणि १०८ नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांचे आशीर्वाद व आध्यात्मिक सान्निध्य लाभणार आहे. तसेच भारत पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी अहिल्यानगर विभागाचे टेरिटरी मॅनेजर मनोज जगताप, बीडचे वरिष्ठ व्यवस्थापक नीलेश नरखेडे, सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार, टेरिटरी को-ऑर्डिनेटर कीर्ती सिंघानी आणि सोलापूरचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन रावत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

         या नव्या सेवा व्यवसायाच्या शुभारंभ सोहळ्याला परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन"बाजीराव पेट्रोलियम"चे प्रोप्रायटर, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी , हरिहर धर्माधिकारी, अ‍ॅड. प्रताप धर्माधिकारी आणि परिवाराने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!