परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
कर्णकर्कश आवाज दाबण्याची मोहीम: बुलडोझरने चिरडून टाकले कारवाईतील सायलेन्सर्स
परळी वैद्यनाथ, प्रतिनिधी...
परळी शहर पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करत जाणाऱ्या बुलेटराजांना दणका देत तब्बल 39 सायलेन्सर वर बुलडोझर फिरवला. या मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत यापुढेही बेशिस्त वाहनचालकांना असाच धडा शिकवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अनेक दुचाकी वाहनधारक सायलेन्सरमध्ये बदल करतात. फटाके फुटल्यासारख्या मूळ सायलेन्सर काढून त्यामध्ये बदल करत कानठळ्या बसवणाऱ्या या आवाजामुळे शहरातील महिला, वृद्ध, शालेय विद्यार्थ्यांत भीती निर्माण झाली होती. भरधाव वेगात रस्त्यांवरून धावणाऱ्या या मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर मुळे नागरिक हैराण झाले होते. याविरोधात अनेक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्याने शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरात विशेष मोहीम राबवत मागील महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या भागांत कारवाई करून 39 बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई करून, सायलेन्सर जप्त करण्यात आले. सोबतच एक लाखांच्या वर दंड वसूल करण्यात आला. बुधवार दि. 3 सप्टेंबर रोजी वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या सायलेन्सरवर बुलडोझर चालवून ते नष्ट करण्यात आले. या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांत समाधान व्यक्त केले आहे.
हि कार्यवाही पोलिस अधिक्षक नवनीत कांवत अप्पर पोलिस अधिक्षक चेतना तिडके आय पी एस अधिकारी शिंदे शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रघुनात नाचन यांच्या मार्गदर्शनाखली वहातुक विभागाचे पोलिस आमलदार प्रल्हाद भताने.संजय खताळ यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा