परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
सप्तशृंगी दुर्गा उत्सवाचे उद्घाटन यावेळी श्रमिकांच्या हस्ते !
श्रमिक वर्गाच्या योगदानाला गौरव देणारा उपक्रम
परळी/प्रतिनिधी – दिनांक 23 सप्टेंबर 2025, मंगळवार सायंकाळी 6 वाजता सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी संस्थेच्या भव्य दुर्गा उत्सवाचे उद्घाटन श्रमिकांच्या हस्ते होणार आहे. या अनोख्या कार्यक्रमात हातगाड्यांपासून हामालीपर्यंत प्रत्येक श्रमिकाचा सहभाग असून, त्यांना विशेष सन्मान दिला जाणार आहे.
सप्तशृंगी दुर्गा उत्सव आपल्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. या वर्षीदेखील देखावा हातगाड्यापासून ते हामाल्यापर्यंत प्रत्येक श्रमिकाच्या हस्ते साकार होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आयोजकांनी सांगितले की, हा कार्यक्रम श्रमिक वर्गाच्या योगदानाला गौरव देणारा ठरणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास परळीतील सर्व घटकातील नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आयोजक दिपक (नाना) देशमुख मा.नगराध्यक्ष, नगरपरिषद परळी, वैजनाथ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा