जिल्ह्यात पावसाचे व पुराचे थैमान, ओल्या दुष्काळाची पहिली मागणी मुंडेंची
बीड जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून, आपत्ती व्यवस्थापन बाबत जिल्हा प्रशासनास सूचना - धनंजय मुंडे
जिल्ह्यात पावसाचे व पुराचे थैमान, ओल्या दुष्काळाची पहिली मागणी मुंडेंची
नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करावा - मुंडेंचे आवाहन
NDRF सह सर्व प्रकारच्या मदतीची आवश्यकता भासणार - धनंजय मुंडे यांची पालकमंत्री अजितदादांशी चर्चा
आपत्ती व्यवस्थापन सोबतच पोलीस प्रशासनाने मदतीसाठी सज्ज राहावे - मुंडेंच्या सूचना
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - मागील ७२ तासांपासून बीड जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली असून, जवळपास सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या सातत्याने संपर्कात असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तसेच कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यासाठी सज्ज राहावे, याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना केल्या असल्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने थैमान घातले असून, खरिपातील पिके जवळपास नष्ट झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना लेखी पत्र द्वारे संपूर्ण बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील बहुतांश जलप्रकल्पांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्या दुथड्या भरून वाहत असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत आहे. अनेक पुलंची पडझड झाली असून, पूलांवरून पाणी वाहत असताना कोणताही धोका नकत करता पूल उलंडू नये अशा सूचना प्रशासन वारंवार देत आहे. अति पावसामुळे सर्व दूर नुकसान झाले असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
दरम्यान पूर परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आढळल्यास एन डी आर एफ तसेच एस डी आर एफ च्या पथकांसह संपूर्ण जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून धनंजय मुंडे यांनी याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्यासोबतही सातत्याने संपर्कात असून प्रसंगी जिल्हा पोलीस दलाने सुद्धा सतर्क राहून प्रसंगी मदत करण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा धनंजय मुंडे यांची संपर्क कार्यालयास मदतीसाठी पाचारण करावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा