परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
नवरात्रोत्सव:अंबाबाई,रेणूकामाता व तुळजाभवानीचे इथे एकत्रित घडते दर्शन
परळीजवळील तीन शक्तीपीठांचा अद्वितीय संगम असलेले मंदिर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
सध्या नवरात्रोत्सव सुरु असुन शक्तीची आराधना करत विविध देवींच्या मंदिरांमध्ये दर्शनाला मोठी गर्दी होत आहे. विविध भागात विविध देवींची ठिकाणे असतात त्यापद्धतीनेच त्या त्या ठिकाणची वेगवेगळी वैशिष्ट्ये बघायला मिळतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पंचक्रोशीत पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेली विविध देवदेवतांची ठिकाणे आहेत. मात्र परळीजवळील एक देवी मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.हे मंदिर पुरातन नसले तरी याठिकाणी अंबाबाई,रेणूकामाता व तुळजाभवानी असे एकत्रित दर्शन घडते.तीन शक्तीपीठांचा अद्वितीय संगम असलेले एक मंदिर गोपीनाथगडावर आहे. त्रिमुर्ती शक्तीपीठांचा अनोखा धार्मिक संगम हे याठिकाणचे वैशिष्ट्य ठरले आहे.
गोपीनाथगड हे ठिकाण परळीपासुन काही अंतरावरच आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ गोपीनाथगड म्हणून नावारुपाला आलेले आहे.आज एक उर्जा,एक आस्था व एक प्रेरणाकेंद्र म्हणून गोपीनाथगडावर दररोज राज्यभरातील लोक दाखल होत असतात.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात एक दैवी व अध्यात्मिक अधिष्ठानही असावे या दृष्टिकोनातून पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी तीन प्रमुख शक्तीपीठांच्या देवींचं एकत्रित मंदिर निर्माण करण्यात आलेलं आहे.
वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण:
गोपीनाथगडाचा विस्तीर्ण परिसर १६ एकरमध्ये विकसित करण्यात आलेला आहे. हे ठिकाण आज एक परळी परिसरातील प्रमुख केंद्र बनलेले आहे. त्याचबरोबर एक अत्यंत अद्वितीय त्री शक्तीपीठ मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकादेवी आणि तुळजापूरची तुळजाभवानी या तीन शक्तीपीठांच्या देवींचं मंदिर एकत्रितपणे येथे आहे. तीन शक्तीपीठांचं एकाच ठिकाणी दर्शन मिळणं हे अनोखं आणि आकर्षक ठिकाण भक्तांसाठी एक विशेष महत्व अधोरेखित करीत आहे. यामुळे पर्यटक आणि भक्तांना एका ठिकाणी तीन शक्तीपीठांच्या महिमा आणि आशीर्वादाचा अनुभव घेता येत आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात या मंदिरात परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.हे मंदिर पुरातन नाही, परंतु एकत्रित तीन शक्तीपीठ असणारे हे अनोखं मंदिर झालेलं आहे. त्यामुळेच याठिकाणी नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी एक अत्यंत अध्यात्मिक अनुभव घेता येत आहे.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून या त्रिमुर्ती शक्तीपीठाचे मंदिर निर्माण करण्यात आले. त्यांचा या मंदिराच्या स्थापनेसाठी असलेला दृढ विश्वास, त्यांच्या आध्यात्मिक व धार्मिक दृष्टीकोनानेच हे ठिकाण साकारले गेले आहे. त्यांनी आपले पिता आणि नेता गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाबरोबरच असे एक अनोखं मंदिर स्थापन करुन श्रद्धा आणि भक्तीला एक अध्यात्मिक अधिष्ठानाची नवीन दिशाही यामाध्यमातून दिली आहे.गोपीनाथगड आज राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. त्याबरोबरच एकाच ठिकाणी तीन शक्तीपीठांच्या देवींचं एकत्रित मंदिर हे एक गोपीनाथगडाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य ठरले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा