परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ग्रामीण पोलीसांची कारवाई: ३ लाखाची गाडी आणि ३० हजारांची दारू पकडली
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
अवैध वाहतूक होणाऱ्या दारुवर परळी ग्रामीण पोलीसांची कारवाई करुन ३ लाखाची गाडी आणि ३० हजारांची दारू पकडली आहे.
पोउपनि संजय रामराव फड (वय 56 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार परळी येथून धर्मापुरीकडे जाणाऱ्या वाहनात अवैध देशी दारु वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने पो. नि. सय्यद (परळी ग्रामीण) यांच्यासह पोलीस कर्मचारी व पंचांसमवेत 03 सप्टेंबर 2025 रोजी 11.30 वाजता धर्मापुरी रस्त्यावर सापळा लावण्यात आला.
यावेळी एक लाल रंगाची व्हिस्टा कार (क्र. MH26 V 3093) ही परळी कडून येताना आढळून आली. ती थांबवून तपासणी केली असता, चालकाने आपले नाव संतोष दगडुबा मस्के (वय 47, रा. संत तुकाराम नगर, वडसावित्री, परळी वैजनाथ) असे सांगितले.
सदर वाहनाची झडती घेतली असता खालील मुद्देमाल मिळून आला:देशी दारू (टैंगो पंच कंपनी) – एकूण 500 बाटल्या (प्रती बॉटल ₹50) – एकूण किंमत ₹25,000/-
व्हिवो मोबाईल फोन (जुना) – अंदाजे किंमत ₹8,000/-
व्हिस्टा कार (लाल रंग) – अंदाजे किंमत ₹3,00,000/-
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ₹3,33,000/- इतकी आहे.
देशी दारू विनापरवाना व बेकायदेशीररित्या वाहून नेल्याबद्दल 65(ई), (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे.पुढील तपास सुरू असून अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचे लक्ष आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा