परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
मूकबधिर शाळेच्या शिक्षकाची आत्महत्या
केज :- केज तालुक्यातील सारणी (सां.) येथे एका मूकबधिर विद्यालयातील शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ घटना घडली आहे.
सारणी (सां.) ता. केज येथील अशोक नारायण भंडारे (वय ४६) हे उमरी फाटा येथील मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयावर शिक्षक होते. ते केज शहरात वास्तव्यास होते. दि. १९ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्या सारणी (सां.) गावी जाऊन स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती मिळताच जमादार उमेश आघाव, सिद्दीक शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. त्यांनी आत्महत्या का केली ? याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा