परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ना.पंकजा मुंडे यांनी शेताच्या बांधावर जावून केली नुकसानीची पाहणी
शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ; शेतकऱ्यांना दिला दिलासा
बीड।दिनांक २१।
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी पाटोदा तालुक्यात शेताच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत अतोनात नुकसान झालेल्या पाटोदा तालुक्यातील भाकरेवस्ती तसेच वैद्यकिन्ही परिसरातील शेताच्या बांधावर जावून पंकजाताई मुंडे यांनी दुपारी नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे बाजरी, सोयाबीन, कापूस, उडीद आदी पिके पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदतीसाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाहणी करताना त्यांच्यासमवेत महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा