इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध परळीत गुन्हा दाखल



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       मराठा समाजाबद्दल जाती आधारित वक्तव्यामुळे आमचा अपमान व मानहानी झाली असुन याबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार परळीतील मराठा समाज बांधवांनी पोलीस स्टेशनला एका निवेदनाद्वारे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश घेऊन परळी पोलिसांनी या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला केला आहे.याबाबत देवराव लुगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत हाके हे भाषणामध्ये मराठा समाजाला उद्देशुन म्हणाले की, तुम्ही आता ओबीसी मध्ये आलात, आता पहीले 11 विवाह आपल्या आपल्या मध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आल्याने जात पात राहीली का? पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहीलात का? तसेच त्याच व्हीडीओ मध्ये नवनाथ वाघमारे रा. जालना यांनी मराठवाड्यातील मराठा समाज हा निजामाची औलाद असुन या निजामाच्या औलादीला आपल्या आरक्षणामध्ये घेवु नका असे वक्तव्य केले होते. ही विधाने जातीच्या आधारावर अपमान होईल असे मराठा समाजा विषयी भाषण केले. मराठा समाजाचा अपमान केला, मानहानी केली असे नमूद करण्यात आले आहे. यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!