परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ना.पंकजा मुंडेंमुळे मिळाला महासांगवीच्या श्री संत मीराबाई संस्थानला २ कोटी ४० लाखाचा निधी
देवस्थान परिसरात भक्त निवासासह होणार विविध विकासाची कामे
बीड।दिनांक १०।
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे पाटोदा तालुक्यातील महासांगवीच्या श्रीक्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थानला यात्रास्थळ योजनेतून २ कोटी ४० लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. संस्थानच्या मठाधिपती ह.भ.प. राधाताई सानप यांनी याबद्दल ना. पंकजाताईंचे आभार मानले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत जिल्ह्यातील श्रीक्षेत्र संत मीराबाई गुरू भगवान संस्थानला यात्रास्थळाच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकास कामांना ना. पंकजाताई मुंडे यांनी या अगोदरच तीन कोटी रूपये मंजूर केले होते, त्यातील वीस टक्के निधी रूपये साठ लाख त्यांना मिळालेले होते, उर्वरित २ कोटी ४० लाखाचा निधी त्यांना आज ग्रामविकास विभागाने वितरित केला आहे.
भक्तनिवासासह होणार विविध विकास कामे
या निधीतून संस्थान परिसरात पुरूष व महिलांसाठी भक्त निवासासह वाहनतळ, पोहोच रस्ता, एलईडी पथदिवे, सौर पथदिवे, संरक्षण भिंत तसेच सुशोभिकरणाची कामे होणार आहेत. ना. पंकजाताई संत मिराबाई संस्थानच्या भक्त असून संस्थांनशी त्यांचा ऋणानुबंध आहे, त्यांच्यामुळे हा निधी आम्हाला मिळाला असून त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत अशा शब्दांत ह.भ.प. राधाताई सानप यांनी आभार मानले आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा