परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांचा वाढदिवस साजरा
परळी वैजनाथ :भाजपा तालुका अध्यक्ष तथा वैधनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक श्री राजेश भाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. राजेश भाऊ गित्ते मित्र मंडळाच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळा बेलंबा (नेहरू नगर )येथील विद्यार्थ्यांसाठी चटई वाटप करण्यात आले. तसेच विध्यार्थी यांना खाऊ वाटप करण्यात आला. पर्यावरण संतुलणासाठी शाळेच्या प्रांगणात वृक्षआरोपण करण्यात आले.
कार्यक्रमास गावातील नागरिक, शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश भाऊ गित्ते मित्र मंडळाचे अध्यक्ष केशव गित्ते, तुकाराम गित्ते, ओम गित्ते , वैजनाथ गित्ते दत्ता सूळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा