परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ना. पंकजा मुंडेंचा परळी, अंबाजोगाईत हाऊसफुल्ल जनता दरबार ; शिस्तबद्ध नियोजनाने जनतेच्या समस्यांचा जागेवर निपटारा
परळी वैजनाथ।दिनांक १८।
राज्याच्या पर्यावरण, वातारणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांचा आज परळी व अंबाजोगाई येथे हाऊसफुल्ल जनता दरबार झाला. त्यांना भेटून समस्या मांडण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ना. पंकजाताईंनी प्रत्येकाला वैयक्तिक भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकली व त्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.
ना. पंकजा मुंडे रात्री बीड येथील कार्यक्रम आटोपून उशीरा शहरात आगमन झाले. शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी त्यांनी जनता दरबार घेतला. तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पालिकेचे मुख्याधिकारी कांबळे व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आजचा दिवस परळी मतदारसंघातील अभ्यागतांसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आलेल्या प्रत्येकांना भेटत, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांच्या कामाचे पत्र असतील, फोन असतील किंवा वैयक्तिक काम असेल ते त्यांनी जागेवरच सोडविले.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुण्याईचा वसा अन् वारसा जबाबदारीने पुढे नेण्याची प्रेरणा देणारी ही गर्दी होती. सत्तेतील मंत्रीपदाचा वापर तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असं त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, परळीचा जनता दरबार आटोपून त्यांनी अंबाजोगाई येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश कराड यांच्या निवासस्थानी केज मतदारसंघातील सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकली व त्यांच्या समस्यांचाही जागेवर निपटारा केला.
जनतेसाठी शिस्तबद्ध नियोजन
-----------
कामे घेऊन येणारांची दरवेळेस होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन ना. पंकजाताईंनी या दौऱ्यात भेटीचे शिस्तबद्ध नियोजन केले होते. प्रचंड गर्दीमुळे नियोजन कोलमडते, हा अनुभव पाहून आलेल्या प्रत्येकाचे काम मार्गी लागले जावे, त्यांचे प्रश्न ऐकले जावेत यासाठी या दौऱ्यात जिल्ह्यातील सहाही मतदारसंघाला दिवस आणि वेळ निश्चित करून दिला. सकाळी परळी मतदारसंघाचा तर दुपारी अंबाजोगाई येथे केज मतदारसंघासाठी जनता दरबार घेतला. अतिशय शिस्तबद्ध रितीने कुठलाही गडबड, गोंधळ न होता सर्व सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या मांडून त्या सोडवू शकला, या नियोजनामुळे अभ्यागतांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा