परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ना.पंकजा मुंडे यांची ममदापूरला भेट ; नदीत वाहून गेलेल्या शिवराज कदम यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन
परळी वैजनाथ।दिनांक २०।
तालुक्यातील ममदापूरचे रहिवासी शिवराज माणिकराव कदम हे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी ममदापुर येथे जाऊन कदम कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
मौजे कौडगाव हुडा येथील लिगी नदीत वाहून गेलेल्या शिवराज माणिकराव कदम (वय ३८) यांचा मृतदेह अखेर अथक शोधमोहीमीनंतर आढळून आला. त्यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
शिवराज कदम हे नदीपात्र ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. स्थानिक प्रशासन, आपत्कालीन पथक व गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. अखेर त्यांचा मृतदेह सापडल्याने शोधकार्य संपुष्टात आले.या दुःखद प्रसंगी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. या दु:खद घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ देवो अशा भावना पंकजाताईंनी व्यक्त केल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा