परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
जायकवाडी धरणातून विक्रमी विसर्ग; परळी तालुक्यातील पाच गावांतील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर
परळीवैजनाथ: प्रतिनिधी...
जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसरात्र झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात आवक २ लाख ७५ हजार १६८ क्युसेक सुरू आहे .पुढील धोका टाळण्यासाठी जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडून २७ दरवाज्यातून टप्प्याटप्प्याने २ लाख २७ हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे. या अनुषंगानेच संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नदीकाठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.परळी तालुक्यातील पाच गावांतील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
पाच गावांतील नदीकाठावरील नागरिकांचे स्थलांतर....
परळी तालुक्यातील पोहनेर/डिग्रस/तेलसमुख/बोरखेड, ममदापुर या गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्याबाबत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाला एका पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. दिनांक २२.९.२०२५ रोजी पासून तालुक्यात अतिवृष्टी व पुरजन्य परिस्थिती झाली आहे, तसेच आज दिनांक २८२८.९.२०२रोजी माजलगाव / जायकवाडी धरणातील पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आल्याने सदर नदीला मोठया प्रमाणात पुराचे पाणी आलेले असून त्यात आज रात्री व उद्या दिनांक २९.९.२०२५ रोजी व त्यानंतर ३०.९.२०२५ रोजी पुरस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील नदीकाठची गावे मौजे पोहनेर डिग्रस, तेलसमुख, ममदापुर, बोरखेड या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने दिनांक २२,२३ व २४ सप्टेंबर, २०२५ च्या गोदावरीच्या पुरामुळे निर्माण झालेल्या बॅक वॉटरमुळे मौजे पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड व ममदापुर या गावातील जी घरे, कुटुंब बाधीत झालेली आहेत तसेच लगत अजून काही घरे/कुटूंब बाधित होऊ शकतात अशी कुटूंब तात्काळ वस्तीचा/गावाचा संपर्क तुटण्यापुर्वी सुरक्षीत वेळेत स्थलांतरीत करावेत असे देण्यात आले आहेत.पोहनेर : जिल्हा परिषद शाळा पोहनेर तर डिग्रस, तेलसमुख,बोरखेड,ममदापुर :जिल्हा परिषद शाळा रामेवाडी/कासारवाडी व दत्त मंदीर या ठिकाणी हे स्थलांतर करण्यात येणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा