राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे निधन – पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला शोक
संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी हरवले !
परळीवैजनाथ, प्रतिनिधी–
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी कार्यकर्ते मधुभाई कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संघपरिवारासह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मधुभाई कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी हरवले असल्याची शोकभावना त्यांनी व्यक्त केली.
आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने एका तपस्वी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या त्याग, समर्पण आणि सेवा कार्याला विनम्र अभिवादन.
मधुभाई कुलकर्णी यांनी अनेक दशकं संघाच्या प्रचार आणि विस्तार कार्यात आपले योगदान दिले होते. त्यांच्या कार्यशैलीमध्ये सादगी, शिस्त आणि सेवाभाव यांचा संगम होता. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.असे ना.पंकजा मुंडे यांनी आपल्या शोकसंवेदनांमध्ये म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा