जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

Red alert : in :Jalna district: जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोय


Pankaja Munde: पालकमंत्री ना. पंकजा मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

जालना ।दिनांक २९।

जोरदार अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत सात हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. पुरात सापडलेल्या लोकांना अन्न धान्यासह त्यांच्या जेवणाची देखील सोय केली. केवळ माणसानांच नाही तर शेतकऱ्यांच्या पशूधनाला देखील प्रशासनानेच वाचवले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी याबद्दल कलेक्टर व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

Heavyrain:

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या आपत्तीत नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या भागात पाण्यामुळे धोका निर्माण झाला, त्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन त्यांच्या निवास, जेवणा व वैद्यकीय सोय करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Naturaldisaster:

प्रशासनाची तातडीने मदत ; नागरिक व पशूधनाला सुरक्षित हलवले

Godavari Rever :  गोदावरी नदीतून सुमारे 3 लाख क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आल्याने. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतुर तालुक्यांतील गोदावरी नदीच्या काठावरील सुमारे 38 गावे बाधीत झाली आहेत. यामुळे बऱ्याचशा गावांना  स्थलांतरीत करण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी या तालूक्यातील सुमारे 7 हजाराहून अधिक नागरिकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आले असून, यातील 7 हजार 599 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या निवास व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. 

Animals alsorelocated to a safe place : 

अनेक शेतकर्यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करुन त्यांना चारा देण्यात येत आहे. कोणालाही इजा पोहोचू न देता नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी  जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 26 महसूल मंडळातील गावे बाधीत झाली असून, येथील नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. काही भागात घरांची पडझड झाली असून शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पूरस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या नागरिकांना शासनस्तरावरून तातडीची मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचेही मंत्री पंकजाताईंनी सांगितले 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !