परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
गोविंद देशमुख यांना पितृशोक: दिनकरराव देशमुख सिरसाळकर यांचे निधन
सिरसाळा, प्रतिनिधी....
सिरसाळा येथील सर्वपरिचित दिनकरराव देशमुख सिरसाळकर यांचे आज शनिवार दि.२७ रोजी सुमारे रात्री १०.४५ वा. अल्पश: आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ६२ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे.
दिनकरराव देशमुख सिरसाळकर हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते.या दरम्यान आज दि.२७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय सुस्वभावी,संयमी व मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.अनेक वर्षे त्यांनी चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड येथे सेवेकरी म्हणून गुरुसेवा केली. त्यामुळे त्यांचा सर्वदूर परिचय होता. सिरसाळा येथील प्रतिष्ठित व्यावसायिक भास्करराव देशमुख यांचे ते भाऊ तर गोविंद देशमुख यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने देशमुख परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
आज अंत्यसंस्कार
दरम्यान दिवंगत दिनकरराव देशमुख सिरसाळकर यांच्या पार्थिवावर सिरसाळा ता.परळी वैजनाथ येथे आज रविवार दि.२८ रोजी सकाळी १० वा. अंत्यसंस्कार होणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा