पंकजा मुंडेंच्या विविध ठिकाणी सांत्वनपर भेटी ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वसंत चव्हाण धडाडीचे कार्यकर्ते होते, त्याच्या जाण्याने वेदना झाल्या - ना. पंकजा मुंडे
जळगव्हाण तांडा येथे जाऊन परिवाराला दिला धीर; परळीत फड, बिडगर, मराठे, हरंगुळे परिवाराचे केले सांत्वन
परळी वैजनाथ ।दिनांक २०। परळी तालुक्यातील जळगव्हाण तांडा येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांच्या नातीचे एका दुर्दैवी अपघातात निधन झाले, त्यांच्या निधनाने मी धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे अशा शब्दांत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जळगव्हाण तांडा येथे चव्हाण कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
त्याचबरोबर परळी शहरातील नामवंत व प्रतिष्ठित व्यापारी कै. निवृत्ती फड यांचेही नुकतेच निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पंकजाताई मुंडे यांनी फड कुटुंबीयांचे सांत्वन केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे परळी शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांच्या पुतणीचे नुकतेच दुःखद निधन झाले, त्यांच्या निवासस्थानी जाऊन हरंगुळे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. परळीतील जेष्ठ विधिज्ञ ॲड.प्रकाश मराठे यांचे जेष्ठ बंधू विजयकुमार मराठे यांच्या पत्नी सौ.शोभाबाई मराठे यांचे निधन झाले. पंकजाताईंनी मराठे कुटुंबाचे भेट देऊन सांत्वन केले. भाजपचे जेष्ठ नेते दिलीप बिडगर यांचे बंधू आत्माराम बिडगर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले.दाऊतपुर येथे जाऊन पंकजाताईंनी बिडगर कुटुंबाचे सांत्वन केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा