सलग दुसर्‍या दिवशी लाचखोरावर कारवाई...

पाच हजाराची लाच घेणारा केंद्रप्रमुख जाळ्यात !



गेवराई, प्रतिनिधी...

    चौकशी आहवाल  व्यवस्थीत पाठवण्यासाठी गोंविद शेळके केंद्रप्रमुख, जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगांव ता. गेवराई, जि.बीड (वर्ग) रा. धारवटा ता गेवराई, जि. बीड. यांना पाच हजाराची लाच  घेतांना कारवाई करण्यात आली आहे.

   याबाबत हकिकत अशी की, दिनांक 18.09.2025 रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड चे पोनि राहुलकुमार मोळ यांचेकडे कोळगांव ता. गेवराई जि.बीड येथे लेखी तक्रार दिली की, त्यांचे विरुदध आर्थिक अनियमीतता केल्याचे तकारी अनुषंगाने चालु खात्याअंतर्गत चौकशीमध्ये अहवाल व्यवस्थीत पाठवून मदत करण्यासाठी 5,000/ रुपये लाचेची आलोसे यांनी मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचे कडे तक्रार दिली.

दिनांक 18.09.2025 रोजी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी तक्रारदार व पंच 1 यांना केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगांव येथे आलोसे गोंविद शेळके यांच्याकडे पाठवून पडताळणी केली असता, आलोसे गोविंद शेळके यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे विरुदध आर्थिक अनियमीतता केल्याचे तकारी अनुषंगाने खात्याअंतर्गत चौकशीमध्ये अहवाल व्यवस्थीत पाठवून मदत करण्यासाठी 5,000/रुपये लाचेची आलोसे यांनी मागणी करुन तडजोडीअंती 5000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

    आज दिनांक 20.09.2025 रोजी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष लाचेची रक्कम 5000/ रुपये ही आलोसे गोविंद शेळके यांनी कधी कॉलनी येथे तकारदाराचे घरी पंचासमक्ष स्विकारले असता आलोरो यांना सापळा पथकाने ताब्यात घेऊन लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त केली. त्यांचे विरुध्द आज दिनांक 20.09.2025 रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर जिल्हा बीड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सदरची कारवाई मा.श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, श्री. शशिकांत शिंगारे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार मोळ, समाधान कवडे, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अमोल खरसाळे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदिप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, अंबादास पुरी, गणेश मेत्रे सर्व ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !