गुरुदेव तुम्हारी जय जय हो......!!!
उमरखेड संस्थान मठाधिपती प.पु.माधवानंद महाराज आज परळीत
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे प्रचलित मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराज यांचे आज (दि.१३) परळी वैजनाथ येथे आगमन होणार आहे. या निमित्ताने भाविक भक्त, शिष्यमंडळींना सद्गुरु दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे प्रचलित मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराज यांचे आज दि. 13 रोजी सकाळी सात वाजता आगमन होणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर पुरुषोत्तम रंगराव देशमुख सिरसाळकर यांच्या निवासस्थानी आगमन होऊन या ठिकाणी पाद्यपूजन व अल्पोपहार होणार आहे. त्यानंतर पद्मावती गल्ली येथे प्रसन्न सतीशराव करमाळकर यांचे निवासस्थानी सकाळी नऊ ते अकरा पाद्यपूजा, विश्वंभर दर्शन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने परळी व पंचक्रोशीतील शिष्य संप्रदाय व भाविक भक्तांना परमपूज्य सद्गुरु माधवानंद महाराज यांचे सानिध्य व स्वयंभू विश्वंभर पूजन सोहळा, दिव्य दर्शन याचा लाभ होणार आहे. शिष्य व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वामनानंद सेवा मंडळ परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा