भावपूर्ण श्रद्धांजली: परळीच्या पत्रकारितेतील निराभिमानी, निष्पक्ष, सर्वसमावेशक, सकारात्मक विचारधारेचा संपादक हरवला!

दुःखद वार्ता: दैनिक मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणे यांचे निधन 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी...

    बीड- परभणी- जालना- छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाशित होणाऱ्या मराठवाड्यातील अग्रगण्य दैनिक मराठवाडा साथीचे संपादक तथा परळीच्या माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांचे चिरंजीव सत्यनारायण उर्फ सतीश मोहनलाल बियाणी यांचे आज सायंकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५७ वर्षे वयाचे होते.

      गेल्या काही दिवसापासून सतीश बियाणी  हे आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान आज दि. 12 रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पक्षात आई, दोन भाऊ- भावजया, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पुतणे असा मोठा परिवार आहे. गेल्या अनेक वर्षापासून दैनिक मराठवाडा साथीचे संपादक म्हणून त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे पत्रकारितेत काम केलेले आहे.मुख्य संपादक कै.मोहनलाल बियाणी यांच्या हाताखाली पत्रकारितेत त्यांनी सक्रियपणे कामाला सुरुवात केली. पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी दैनिक मराठवाडा साथीचे व्यवस्थापन व संपादकीय जबाबदारी अनेक वर्षे अगदी नेटाने पार पाडली. मराठवाडा साथीच्या विविध जिल्ह्यातील आवृत्या  प्रकाशित करून मराठवाडा साथीचा विस्तार करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले.आजतागायत अतिशय जबाबदारीने सकारात्मक व समाजाभिमुख अशा प्रकारची पत्रकारिता त्यांनी या दैनिकाच्या माध्यमातून केली. परळी वैजनाथ येथे अतिशय कष्टातून व मेहनतीने त्यांनी आपले जीवन घडवले.कुटुंबात असलेला सामाजिक वारसा जपत परळीतील प्रत्येकाशी अतिशय जिव्हाळा व आपलेपणाचे नाते जपण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. अतिशय संयमी, मितभाषी, सुस्वभावी, धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परळी शहरात ओळख आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त केली जात आहे.

 छत्रपती संभाजीनगर येथे होणार अंत्यसंस्कार

       दरम्यान दिवंगत सतीश बियाणी यांच्या पार्थिवावर आज दिनांक १३ रोजी सकाळी १० वा.सिडको बसस्टॅण्डच्या पाठीमागे, हॉटेल ग्रँड कैलासच्या बाजूला, प्रविण मॅजिकच्या बाजूची गल्ली, श्री अंजनी कुरिअर्सच्या समोर सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

टिप्पण्या

  1. मनमिळावू माझ्या नाट्य कलेचे,व कलाकार म्हणून सतत प्रोत्साहित करणारे बंधु समान सतीशजी आपण अशी अचानक एक्झीट का घेतली, ? आपली उणीव भासत राहणार, आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. आनंद जोशी.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !