परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
दहा दिवस चाललेल्या जैन धर्मिय पर्युषण महापर्वाची पालखी सोहळ्याने सांगता
दहादिवस,अभिषेक,अष्टक, मंगल गीत व महाप्रसादाचे आयोजन
परळी (प्रतिनिधी)
सकल जैन समाजाच्या वतिने परळी येथील श्री १००८ चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिरात पर्युषण महापर्युषण पर्वानिमीत्त दि.२८ ऑगस्ट पासुन दहा दिवस सुरु असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रम व पर्युषण महापर्व महोत्सवाची सांगता सोमवार ८ सप्टेंबर रोजी भगवंतांच्या पालखी सोहळ्याने झाली.यानिमीत्त सोमवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जैन धर्मामध्ये पर्युषण पर्वास मोठे धार्मिक महत्व आहे.भाद्रपद शुध्द पंचमी ते भाद्रपद वद्य प्रतिपदा या दहा दिवसांमध्ये जैन समाजबांधव निरंकार उपवास करतात.उत्तम क्षमा,उत्तम मार्दव,उत्तम आर्जव,उत्तम सत्य,उत्तम शौच,उत्तम संयम,उत्तम तप,उत्तम त्याग,उत्तम अकिंचन्य व उत्तम ब्रम्हचर्य चे व्रत घेवुन महिलांनी तत्वार्थ सुत्र या ग्रंथाचे पारायण केले.परळी शहरातील श्री १००८ दिगंबर जैन मंदिरात दि.२८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ६ ते ७ सुप्रभात मंगल गित,सकाळी ७ वा.क्षमावली,८ ते ९ वा.पंचामृत अभिषेक,पूजन,अष्टक असे नित्य कार्यक्रम पार पडल्यानंतर सोमवार दि.८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भगवान महाविर यांचा पालखी सोहळ्यास जैन मंदिरातुन प्रारंभ झाल्यानंतर नांदुरवेस,गोपनपाळे गल्ली,अंबेवेस,गणेशपार मार्गे जैन मंदिरात आल्यानंतर आरती करण्यात आली.या पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी रांगोळी काढुन स्वागत करण्यात आले.फेटे बांधून महिला सहभागी झाल्या होत्या.सोमवारी सकाळी ७ वाजता क्षमावली,झाल्यानंतर रमेश संघई यांच्या वतीने अल्पोपहार व सायंकाळी ४ वाजता महावीर महालिंगे यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.दहा दिवस चाललेल्या या पर्युषण महापर्वात महावीर संघई,मोहन संघई,बालासाहेब रोकडे,सुभाष महाजन,कुलभुषन कटके,वैभव कुरकुट आदी जैन समाजबांधवांनी भगवंताची नित्य पुजा केली.
@@@@@
सकल जैन समाजबांधवांचा सहभाग
या पालखी सोहळ्यात चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर चे अध्यक्ष ओमप्रकाश मुळजकर,महावीर संघई,विजय बेंडसुरे,महावीर महालिंगे,अजित कुरकुट,मोहन संघई,अमोल संघई,बालासाहेब रोकडे,नेमचंद कुरकुट,सुरेश संघई,रमेश संघई,वैभव कुरकुट,सुमनबाई कुरकुट,सौ.मनिषा संघई,सौ.सुवर्णा संघई,सौ.प्रीती रोकडे,स्वाती बेंडसुरे,अर्चना बेंडसुरे,सुवर्णा बेंडसुरे,प्रिती संघई,स्वप्नाली कुरकुट,सुनिता संघई,ललिता चोभारकर,मालन महालिंगे,शोभा कुरकुट आदी जैन समाजबांधव सहभागी झाले होते.
@@@@@
आत्मिक उन्नतीसाठी पर्युषण महापर्व
जैन पर्युषण महापर्व हे आध्यात्मिक शुद्धीकरण,आत्म-चिंतन आणि आत्म-साक्षात्कारासाठी आहे, ज्यामध्ये जैन अनुयायी उपवास, स्वाध्याय,ध्यान आणि क्षमा-याचना यांसारख्या कृती करतात. हे पर्व कर्माचा क्षय आणि आत्मिक उन्नतीसाठी एक मोठा संधी मानले जाते,ज्याचा उद्देश सांसारिक सुखांचा त्याग करून आंतरिक शांती आणि परमानंद मिळवणे हा आहे.पर्युषण पर्वामुळे मनातले काम, क्रोध, लोभ,वैमनस्य यांसारखे विकार कमी होतात आणि सखोल चिंतन करण्यास प्रेरणा मिळते.या काळात जैन धर्माची पंचशील तत्त्वे -सत्य,अहिंसा,अस्तेय,अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य यांचा सराव केला जात असल्याने जैन धर्मामध्ये पर्युषण महापर्वास मोठे धार्मिक महत्व आहे.
- अमोल संघई-जैन
परळी-वैजनाथ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा