परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या उपाययोजनांवर ना. पंकजा मुंडे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
शिरूर कासार, बीड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; भाजप कार्यकर्त्यांनी मदत पोहोचवली
घाबरून जावू नका, स्वतःची काळजी घेण्याचे केले कळकळीचे आवाहन
बीड।दिनांक २२।
काल रात्री पुन्हा एकदा अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपले. शिरूर कासार, बीड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नागरिक उघड्यावर आले. दरम्यान, अतिवृष्टीने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली असून यावर उपाययोजना करण्यासाठी आपण उद्या मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्याचा आठवडाभराचा दौरा करून अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून, प्रशासनाची आढावा बैठक घेऊन ना. पंकजाताई मुंडे मुंबईला रवाना झाल्या. आपल्या दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांचा अधिकचा वेळ न घालवता नुकसानीचे पंचनामे आणि मदतीला जाण्यासाठी त्यांनी सांगितले. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आज मुंबईत पोचताच काल रात्रीपासून शिरूर कासार, बीड आणि अन्य ठिकाणच्या अतिवृष्टीची माहिती त्यांना समजली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे, उद्याच आपण यासंदर्भात कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मदतीबाबत आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घाबरू नका, स्वतःची काळजी घ्या..कळकळीचे आवाहन
---------
यासंदर्भात ना पंकजाताईंनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, अतिवृष्टीचा आढावा घेतला, अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे, मदतीचे आदेश दिले पण आज मदत, पैसाअडका हे महत्वाचे नाही तर तुमचे मनोबल महत्वाचे आहे.आपलं घर डोळ्यासमोर वाहून जाताना पाहून तुम्हाला काय यातना होत असतील याची कल्पना मी करू शकत नाही. कॅबिनेट मध्ये आपली प्रतिनिधी म्हणून हेच बोलण्यासाठी मी मुंबईत आले आहे. उद्या मुख्यमंत्र्याशी यावर बोलेल आणि पुन्हा लगेच जिल्ह्यात येईल, जिथे शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि तुमचे मनोबल वाढवायला, त्यामुळे घाबरून जावू नका, मनोबल हारू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, उगीचच पुराच्या पाण्यात जावू नका, मी कलेक्टरशी बोलले, जेवढी यंत्रणा शक्य आहे, तेवढी वापरून अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहोत. मी लगेच येत आहे, तुमचा धीर वाढविण्यासाठी असं त्या म्हणाल्या.
भाजपा कार्यकर्त्यांनी मदत पोचवली
-------
दरम्यान ना पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी ब्रह्मनाथ येळंब येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत करून त्यांना जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ त्यांच्यापर्यंत पोचवले. रामदास बडे, जालिंदर सानप, विवेक पाखरे आदी कार्यकर्त्यांनी ही मदत संकटात सापडलेल्या ग्रामस्थांपर्यत पोचवली.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा