परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

डॉ. वासुदेव मुलाटे यांना पुरस्कार प्रदान होणार.

 भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार २०२५




डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते तर राजेंद्र जगताप यांच्या प्रमुख  उपस्थितीत डॉ. वासुदेव मुलाटे यांना पुरस्कार प्रदान होणार


अंबाजोगाई – (वसुदेव शिंदे)- यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक व साहित्याचे अभ्यासक डॉ. वासुदेव मुलाटे यांना महाराष्ट्रातील थोर विचारवंत व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे  अध्यक्ष  डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व बीडचे माजी.आमदार राजेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येईल अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव  दगडू लोमटे  यांनी दिली आहे. 

शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५  सायंकाळी ५ वाजता  आद्यकवी मुकुंदराज सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. सुसंकृत राजकारणी, साहित्य, क्रीडा, संगीत, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रातील एका मान्यवरास हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी  डॉ. वासदेव मुलाटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार, २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

डॉ. वासुदेव मुलाटे हे एक महत्वाचे लेखक मराठी साहित्याच्या विश्वासात  बीड जिल्ह्याने दिले आहेत. अंधाररंग, अबॉर्शन आणि इतर कथा,  काळोखवेणा, झाड आणि समंध, व्यथाफूल हे कथा संग्रह व मराठवाड्याची कथा,  ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास हे ग्रंथ आहेत. उलगुलान आणि तडजोड: एक आकलन, ग्रामीण साहित्य चळवळ एक ध्यासपर्व, ग्रामीण साहित्य : स्वरूप व दिशा, ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा, चिंतनाच्या क्षितिजावर, झाकोळलेल्या वाटा हे आत्मकथन,  दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप, नवे साहित्य नवे आकलन, बिंब प्रतिबिंब, मनातलं आभाळ - ललित लेख, विषवृक्षाच्या मुळ्या - कादंबरी, शेतकऱ्यांचा असूड, शोध जाणिवांचा ही समीक्षात्मक, संशोधनात्मक ग्रंथा बरोबरच  हार्ट क्रॅकर - विनोदी एकांकिका त्यांनी लिहिली आहे. असा एक महत्वाचा लेखक माजलगावच्या मातीत जन्मला, अमळनेरच्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

या पुरस्कार वितरण समारंभास अंबाजोगाईतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, डॉ. कमलाकर कांबळे, सतीश लोमटे, प्रा सुधीर वैद्य, प्रा. भगवान शिंदे, डॉ. प्रकाश प्रयाग, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, त्र्यंबक पोखरकर मार्गदर्शक भगवानराव शिंदे बप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!