परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

बीड जिल्हयाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न...

ना. पंकजा मुंडेंनी बैलगाडीतून केली नुकसानीची पाहणी

नुकसानग्रस्तांशी साधला संवाद ; सॅनिटरी नॅपकिन पासून पेन किलर पर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तू पाठविण्याचे दिले आदेश

धोंडराई, हिरापूर, शिरूर कासार, ब्रह्मनाथ येळंब, मानूरसह पाथर्डीतही केला दौरा



बीड जिल्हयाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न...


बीड।दिनांक २४।

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्ह्यात बैलगाडीतून नुकसानीची पाहणी केली. जिल्हयात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून शासनामार्फत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत असे त्यांनी सांगितले.

    मागील आठवड्यानंतर जिल्हयात पुन्हा एकदा गेल्या दोन दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी झाली. विशेषतः शिरूर कासार, बीड ग्रामीण, गेवराई, माजलगांव या तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला, अनेकांच्या घरांचे नुकसान झाले, संसार उघडय़ावर आले तर पिकांमध्ये तळे साचले, जमीन पार खरडून गेली. 

   ना. पंकजाताई मुंडे अतिवृष्टीचा दौरा करून कॅबिनेट बैठकीसाठी मुंबईला गेल्या आणि त्याच दिवशी जिल्हयात पुन्हा अतिवृष्टी झाली, त्यामुळे तातडीने त्या जिल्हयात दाखल झाल्या. सकाळी पालकमंत्री असलेल्या जालन्यात पाहणी केल्यानंतर दुपारी त्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे आल्या, इथे बैलगाडीतून त्यांनी नुकसानीची पाहणी केली. आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन तसेच सर्व प्रमुख अधिकारी त्यांचेसमवेत होते. 

हिरापूरमध्ये बांधावर घेतला भाजी भाकरीचा आस्वाद

सिंदफणा नदीला आलेल्या पुराचे पाणी हिरापूर परिसरातील शेतात घुसल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली. ना. पंकजाताईंनी दुपारी शेताच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. पाहणी दौऱ्यानंतर एका शेतात शेतकऱ्यां समवेत बांधावरच भाजी भाकरीचा त्यांनी आस्वाद घेतला. ना. पंकजाताईंनी ब्रह्मनाथ येळंब येथे जि.प. शाळेत विस्थापित केलेल्या नुकसानग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सॅनेटिरी नॅपकिन पासून ते पेन किलर पर्यत सर्व जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. नांदेवली, शिरूर कासार, मानूर तसेच पाथर्डी तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) मालेवाडी, मुंगूसवाडे, कीर्तनवाडी आदी ठिकाणीही नुकसानीची पाहणी केली.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा ; अधिकची मदत मिळवून देऊ

गेल्या १७ सप्टेंबर पासून मी अतिवृष्टीचा दौरा करत आहे. परळीत ममदापूर, पोहनेर मध्ये गेले, त्यानंतर पाटोदा तालुक्यात भाकरे वस्ती, वैद्यकिन्हीला पाहणी केली, कलेक्टर ऑफिसमध्ये आढावा घेतला, त्यानंतर मुंबईत जाऊन कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा केली. जिल्हयात खूप जास्त नुकसान झाले आहे, जमीनी खरडून गेल्या आहेत, जिल्हयाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!