परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आकांक्षा तिडके व अस्मिता कांदे च्या नेतृत्वाखालील इंदिरा गांधी विद्यालय कब्बडी संघाचे यश
बीड,प्रतिनिधी...
माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत इंदिरा गांधी कन्या विद्यालय, दिंद्रुड येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्व वयोगटात विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 14 वर्षे, 17 वर्षे व 19 वर्षे वयोगटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळून विद्यालयाचे नाव उल्लेखनीय केले आहे. यात 14 वर्षे वयोगटात अंतिम सामन्यात जिल्हा परिषद हरकी लिमगाव संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले. या संघाचे नेतृत्व कॅप्टन आकांक्षा तिडके व अस्मिता कांदे यांनी केले.
तर 17 वर्षे वयोगटात यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या संघावर मात करत इंदिरा गांधी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. संघाचे नेतृत्व कॅप्टन कल्याणी ठोंबरे व विद्या तावरे यांनी केले. 19 वर्षे वयोगटात अंतिम सामन्यात सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचा पराभव करून इंदिरा गांधी विद्यालयाने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या संघाचे नेतृत्व कॅप्टन गायत्री खडके व नंदिनी कांदे यांनी केले. या सर्व विद्यार्थिनींच्या यशाबद्दल शार्दुलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ. मोहनराव सोळंके, सचिव रामकृष्ण सोळंके, विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव काळे, लांडगेसह विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा