खोलेश्वर शिक्षक सहकारी पतपेढी ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न




अंबाजोगाई :-  येथील खोलेश्वर शिक्षक सहकारी पतपेढी ची ५१ वी सर्वसाधारण सभा जिल्हा कार्यवाह मार्गदर्शक बिपीन दादा क्षीरसागर,

स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल दादा देशपांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले,

पतपेढी चे सचिव सतीश वांगे,तर सभेचे अध्यक्ष धनंजय जब्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.


सभेची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे पतपेढी सभासदांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.या सभेत माजी सदस्य जयेंद्र कुलकर्णी, सुदीप श्रोत्रे, राम काटे (सेवानिवृत्त शिक्षक ) उपस्थित होते त्यांचेही विशेष स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे पतपेढी सभासद तथा लोकमान्य टिळक विद्यालय पोखरी मुख्याध्यापक अरूण पत्की सर,व लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर सर यांचेही विशेष स्वागत करण्यात आले.


सभेमध्ये अहवाल वाचन सचिव सतीश वांगे यांनी केले.यावेळी सभासदांच्या सहकार्यामुळे आपल्या पतपेढीला "अ" दर्जा प्राप्त झाला असून या पुढील काळात असेच आपण सर्वांनी सहकार्य,सूचना,

अभिप्राय द्यावे.असे आवाहनही त्यांनी केले.यानंतर पतपेढी चे अध्यक्ष धनजंय जब्दे बोलताना म्हणाले की, सर्व सभासदांनी खुप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे आपल्याला "अ" दर्जा मिळाला.पुढील काळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही परंपरा चालू ठेवण्यासाठी आम्ही संचालक मंडळ कटिबद्ध आहोत.पतपेढीच्या वतीने आगामी काळात आजपर्यंत सहकार्य केलेल्या मान्यवर सभासदांचे एकत्रीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून पतपेढीचे शिक्षकांसाठी नवनवीन योजना आगामी काळात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले‌.पतपेढीच्या सभासद भगिनींनी आवर्ती ठेव (RD) योजनेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल ऋण व्यक्त केले.


सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित डॉ.अतुल दादा देशपांडे यांनी "अ" दर्जा मिळाल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून यात नक्कीच सातत्य ठेवावे ही प्रमुख अपेक्षा व्यक्त केली. तसेच काही मौलिक सुचना सुध्दा दिल्या..


दुसरे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा कार्यवाह बिपीन दादा क्षीरसागर म्हणाले की,पन्नास वर्ष हे व्यक्तींसाठी फक्त वय असते.आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या पतपेढी ची ही खुप मोठी उंची असते‌.यानिम्मित्ताने या पतपेढी साठी कार्य केलेल्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेणारी एखादी पुस्तिका प्रकाशित करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांनीही यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले त्यांनी पतपेढीची सभासदांना शुभेच्छा दिल्या.ही सभा आनंदात पार पडली याबद्दल आनंदही व्यक्त केला.


या सभेचे सुत्रसंचलन ज्योती उत्तमराव शिंदे यांनी केले, सभेचे इतिवृत्त ज्योती किसनराव शिंदे यांनी केले, प्रास्ताविक रूपाली मुळे यांनी केले, गणेश आराधना किशोरी कुलकर्णी तर आभार उपाध्यक्षा सुरेखा काळे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !