परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वरद लांडगे प्रथम; विनोद सामत यांच्या हस्ते गौरव
परळी (प्रतिनिधी) – परळी शहरातील न्यू हायस्कूल शाळेतील विद्यार्थी चि. वरद श्रीराम लांडगे याने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ब्रेस्ट स्ट्रोक 50 मीटर प्रकारामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेची व शहराची मान उंचावली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैद्यनाथ को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन विनोद सामत यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
क्रीडा विभागाच्या वतीने नुकत्याच जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्हाभरातून अनेक जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. दमदार सराव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वरद लांडगेने प्रभावी कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेत 50 मीटर बेस्ट स्ट्रोक प्रकारात जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला. या यशाबद्दल वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत यांनी वरद लांडगे याचा आपल्या निवासस्थानी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत पेढा भरवून सत्कार करत त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली.
यावेळी बोलताना वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत म्हणाले की “वरदसारख्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपणास अभिमान असुन क्रीडा क्षेत्रातील असे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रात मोठे यश मिळवता येते, हे वरदने सिद्ध करून दाखवले असून वरदने या खेळामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राष्ट्रीय पातळीवर आपल्या परळीचे नाव उंचवावे अशा सदिच्छा व्यक्त करत आगामी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, मुकेश पाटील, पालक श्रीराम लांडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा