परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ना. पंकजा मुंडे यांचा उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडेंशी दूरध्वनीवरून संवाद
धनगर समाजाच्या मागण्यांचा सन्मानच ; मी पाठिशी आहे व राहील
जालना ।दिनांक २४।
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्याशी आज दुपारी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून संवाद साधला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना. पंकजा मुंडे आज जिल्ह्यातील विविध भागात दौर्यावर होत्या. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बोऱ्हाडे गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ना. पंकजाताईंनी आज दुपारी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संवाद साधला. त्या म्हणाल्या, नुकसानीच्या पाहणीसाठी आले आहे, आपण प्रकृतीची काळजी घ्या, धनगर समाजाच्या मागण्यांचा मी सन्मान करते. लोकनेते मुंडे साहेब समाजाच्या पाठिशी होते, मी देखील आहे आणि पुढेही राहील.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा