परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
महिला महाविद्यालयात हिंदी दिवस समारोह उत्साहात साजरा
अंबाजोगाई-वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान संचलित, कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे दि. 18-9-2025 रोजी हिंदी दिवस समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंचक मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राजकुमार कांबळे उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. राजकुमार कांबळे यांनी हिंदी भाषा ही राष्ट्राला जोडणारी व सांस्कृतिक एकतेची प्रतीक आहे असे उद्गार केले. याप्रसंगी डॉ. कांबळे यांनी आपल्या मधुर वाणीतून गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. मंचक मोरे यांनी हिंदी भाषा देशाची राष्ट्रभाषा असून ती सर्वांनी आत्मसात केली पाहिजे असे म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत जाधव यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ. एल.आर.मुंडे यांनी केले. तर आभार प्रा. सुनिल शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा