इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली अन् आढावाही घेतला; आता प्रयत्न मदतीसाठी

ना. पंकजा मुंडेंच्या जनता दरबाराची जिल्हाभरात चर्चा ; 'फेस टू फेस' संवाद, प्रश्नांचा जागेवरच निपटारा झाल्याने सामान्य जनता सुखावली




शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली अन् आढावाही घेतला; आता प्रयत्न मदतीसाठी

बीड।दिनांक २२।

    राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात घेतलेल्या जनता दरबाराची सर्वत्र सकारात्मक चर्चा सुरू आहे. 'फेस टू फेस' संवाद आणि प्रश्नांचा जागेवरच निपटारा झाल्याने सामान्य माणूस सुखावला. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन तर पाहणी केलीच, शिवाय प्रशासनाकडून आढावा घेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

       ना. पंकजाताई १७ तारखेपासून जिल्ह्यात दौर्‍यावर होत्या. आज सकाळी त्या परळीहून माहूरकडे रवाना झाल्या. सकाळी माहूर येथे श्री रेणूकामातेचे त्यांनी दर्शन घेतले. गेले पाच दिवस जिल्ह्यात त्यांनी ज्या पध्दतीने ठिक ठिकाणी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य लोकांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न सोडवले, त्याची सकारात्मक चर्चा होत आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील लोकांना त्या भेटल्या. त्यासाठी त्यांनी प्लॅनिंग ने जनता दरबार घेतला, याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परळी, केज, आष्टी, बीड, गेवराई आणि माजलगांव या भागातील सर्व सामान्य लोकांची गैरसोय होऊ नये, त्यांचे प्रश्न मार्गी लागले जावेत यासाठी प्रत्येकांना त्यांनी वेळ दिला. दौऱ्याचे नियोजन करताना तशा सूचनाच त्यांनी आपल्या अधिकृत दौऱ्यात नमूद केल्या होत्या. दरबारात  आलेल्या प्रत्येकाचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक व कामाचे स्वरूप याची नोंद घेऊन स्वतः प्रत्येकाचे नाव पुकारून त्या भेटल्या. लोकांचे प्रश्न ऐकुन लगेच तिथल्या तिथे कामे मार्गी लावण्याचे आदेश शासकीय अधिकाऱ्यांना त्या देत होत्या, कामाच्या याच पध्दतीची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.


सकाळी आढावा, दुपारी पाहणी
-------

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा ना. पंकजाताईंनी सकाळी जिल्हा प्रशासनाकडून घेतला तर दुपारी पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

मुंबईत गर्दी, गैरसोय टाळावी
-----------

जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला, कामेही मार्गी लागतात मग मुंबईत जाऊन गर्दी, गैरसोय टाळलेली बरी,अशी चर्चा लोकं करत आहेत. ना. पंकजाताई आजच मुंबईला गेल्या, उद्या मंत्रीमंडळाची बैठक नंतर विभागाच्या बैठका असे एका मागोमाग एक कार्यक्रम आहेत,  त्यामुळे पुन्हा मुंबईत येऊन होणारी गैरसोय, गर्दी टाळावी. प्रशासकीय पातळीवर कामे मार्गी लावण्यासाठी थोडा  वेळ दिला तर निश्चित सर्वांची कामे होतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या