अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी निलंबन...

केजचे रंगेल गट शिक्षणाधिकारी अखेर निलंबित


अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी केजचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर निलंबित


केज :- एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेले केजचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी दिली आहे.


या बाबतची सविस्तर माहिती अशी की, दि. १८ सप्टेंबर, गुरुवार रोजी सायंकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी ही तिच्या मानलेल्या मावशी सोबत केक आणण्यासाठी रस्त्याने जात होती. त्यावेळी केज येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हा त्यांना नाष्टा व चहा पाणी करण्याच्या निमित्ताने त्याच्या चार चाकी गाडीत बसवून धारूर चौकातून चिंचपूरच्या मारुती मंदिराच्या रस्त्याने कोल्हेवाडीकडे घेऊन गेला. कोल्हेवाडीच्या रस्त्याच्या कडेला एका निर्जनस्थळी गाडी थांबवून गाडीमध्ये त्या अल्पवयीन मुलीच्या हाताला वाईट हेतूने धरून तिच्या खाजगी अवयवांना वाईट हेतूने स्पर्श करून त्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरून जात त्या अल्पवयीन मुलीने व तिच्या सोबतच्या महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या नंतर त्या रस्त्याने मागून आलेल्या एका वाहनाच्या प्रकाशने घाबरून जात लक्ष्मण बेडसकर हा त्याची गाडी आणि मोबाईल तेथेच ठेवून पळून गेला. 

या घटने नंतर दि. १९ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भेट घेऊन हा माणुसकीला काळीमा फासणारा आणि शिक्षण विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार त्यांना सांगितला होता.

त्या नंतर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री १०:४४ वाजता त्या पीडित अल्पवयीन मुलीची तक्रारी वरून दाखल अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्या विरुद्ध गु. र. नं. ५०९/२०२५ भा. न्या. सं. ७४, ७५(१)(२), ३५१(२) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची दखल शिक्षण विभागाने त्या रंगेल प्रभारी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना निलंबित केले आहे. ही माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी यांनी दिली आहे.

________________________________

बेडसकर अद्यापही फरार :- गटशिक्षण अधिकारी बेडसकर हे गुन्हा दाखल झाल्या पासुन फरार असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी दोन पोलिस पथके रवाना करण्यात आली हात. मात्र अद्यापही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

_______________________________

बेडसकर यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल :- बेडसकर यांचे एका महिलेसोबतचे अश्लील आणि लैंगिक संबंधाचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायल होत असून त्यामुळे प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.

_________________________

वादग्रस्त अधिकारी :- लक्ष्मण बेडसकर हे वेगवेगळ्या प्रकरणात वादग्रस्त असून या पूर्वी त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने केलेल्या छाप्यात अडकले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !