परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
शैक्षणिक क्षेत्राला काळिमा: शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण
केज :- केज येथे एका अल्पवयीन मुलीचे चक्क एका शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा प्रकाराच्या चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यात शिक्षण विभागात एका अधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या असल्याच्या चर्चेला उधाण आलेले आहे. शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकारी हा त्याच्या खाजगी गाडीतून एक महिला व त्या अल्पवयीन मुलीला घेऊन जात होते. त्या मुलीशी तो अधिकारी तिच्याशी गैरवर्तन करीत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. म्हणून तिने मदतीसाठी संपर्क साधला. त्या नंतर काही युवकांनी त्या मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पाठलाग करून त्यांना अडविले. त्या नंतर सदर नराधम हा त्याचा मोबाईल आणि गाडी सोडून पळून गेला. त्या नंतर ती महिला व ती अल्पवयीन मुलगी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून तिच्यावर झालेली आपबिती पोलिस अधिकाऱ्या समोर कथन केली. अखेर त्या गटशिक्षाधिकाऱ्या विरोध पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री १०:४४ वाजता त्या पीडित अल्पवयीन मुलीची तक्रारी वरून दाखल अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्या विरुद्ध गु. र. नं. ५०९/२०२५ भा. न्या. सं. ७४, ७५(१)(२), ३५१(२) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा