इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

नवरात्र महोत्सव निमित्त २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर

 श्रीक्षेत्र रेणुका देवी व मूळजोगाई देवस्थान येथे नवरात्र महोत्सव निमित्त २२  सप्टेंबर ते ७  ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन




अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे )

     प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई येथील श्रीक्षेत्र रेणुका देवी व मूळ जोगाई देवस्थान येथे नवरात्र महोत्सव निमित्त 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर यादरम्यान अखंड हरिनाम सप्ताहा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री रेणुका देवी व मूळजोगाई देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक व पुजारी दत्तात्रय आंबेकर व उत्सवाचे चालक-मालक नानाश्री यादव यांनी दिली आहे. 

    देवस्थानचे मुख्य पुजारी कै. शिवाजीराव आंबेकर त्यांचे सहकारी कै. मुकुंद अप्पा यादव, कै. श्यामलाल मोदी, कै. बी एन सातपुते, कै. ताराचंद परदेशी यांच्या प्रेरणेने व वै. माधव बुवा शास्त्री व ह भ प किसन महाराज पवार यांच्या आशीर्वादाने होत असलेल्या या वार्षिक महोत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता योगेश परदेशी यांच्या हस्ते घटस्थापना व विष्णू शेठ बजाज यांच्या हस्ते गाथा पूजनाने होणार असून या सोहळ्याची सांगता 7 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक आराधी मेळाव्याने होईल.

     दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अशोक मोदी यांच्या हस्ते होम हवन व दुपारी 4 वाजता माननीय तहसीलदार  यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन श्री ची मिरवणूक अंबाजोगाई शहरातून निघेल. 

     या सप्ताह काळात ह भ प बाळासाहेब महाराज कुलकर्णी, ह भ प विकास महाराज गडदे, ह भ प पांडुरंग महाराज कोकाटे, ह भ प अमोल महाराज गोरे ह भ प गजानन महाराज सुवर्णनकार, ह भ प अंबादास महाराज चिक्षे, ह भ प श्रीकृष्ण महाराज चवार, ह भ प अच्युत महाराज जोशी, ह भ प प्रमोद महाराज आव्हाड, ह भ प गोविंद महाराज सुक्रे, ह भ प शिवाजी महाराज ठोंबरे, ह भ प प्रभाकर महाराज उगले, ह भ प पांडुरंग महाराज तिडके ह भ प विठ्ठल महाराज पुरी आधी कीर्तनकारासह 6 ऑक्टोबर रोजी सकाळी अरुण काळे यांच्या हस्ते गाथा भोजन मिरवणूक व दुपारी 12 वाजता  ह भ प किसन महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे. 

      त्या महोत्सवात सकाळी 6 ते 7  विष्णुसहस्त्रनाम, 7 ते 8 सप्तशती पाठ 8 ते 9 अभिषेक 9 ते 11 गात्यावरील भजन 11 ते 1 हरी किर्तन सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ सायंकाळी 6 ते 7 आरती अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

     हा महोत्सव साजरा करण्यासाठी ह भ प अमोल महाराज घोडके, ह भ प महामुनी, दशरथ कदम मनोज जाधव, राजकुमार घोडके परमेश्वर दोनगहू, बाळू औसेकर, प्रमोद पाटील, शामल अंबेकर, गणेश अंबेकर, ओंकार दोनगहू, मनोज मोदी, लखन मोदी, राहुल मोदी, संतोष फुटाने, रणजित लोमटे, अर्जुन काटे, अंकुश शिनगारे, अजय स्वामी, राजू चव्हाण, सविता शेटे, प्रतीक्षा, प्रांजली व सायली अंबेकर, रेणुका आरती ग्रुप आदी मंडळी प्रयत्नशील असून या उत्सवाचा अधिकाधिक  भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी व मूळजोगाई देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक व पुजारी दत्तात्रय आंबेकर व उत्सवाचे चालक-मालक नानाश्री यादव यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!