वैद्यनाथ बँकेचे नवनिर्वाचित संचालक विजयकुमार वाकेकर यांचा जैन समाज बांधवांकडून सत्कार
पर्युषण महापर्व महोत्सव उत्साहात साजरा
Parli Vaijnath:परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्युषण महापर्व महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवनिर्वाचित संचालक विजयकुमार वाकेकर यांचा समाजबांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Jain Paryushanparv: येथील गाव भागात असलेल्या श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात पर्युषण महापर्व महोत्सव उत्साहात साजरे करण्यात आले. याच कार्यक्रमात वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळात विजयी झाल्याबद्दल येथील उद्योजक विजयकुमार वाकेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर जैन मंदिरचे अध्यक्ष ओमप्रकाश मुळजकर, उपाध्यक्ष महावीर महालिंगे, मयूर मुळजकर, संतोष जैन, महावीर संघई आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा