किसान सभेच्या नेतृत्वात बळीराजा एक

झोपेचं सोंग घेणाऱ्या शासनाला जागं करण्यासाठी बळीराजा सज्ज

किसान सभेच्या नेतृत्वात बळीराजा एक

परळी / प्रतिनिधी....यंदाच्या खरीप पूर्व आणि खरिपात झालेली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, शेतीपिक, माती आणि शेतमजूर यांचे अतोनात हाल झाले असून अद्याप देखील दगडाचे काळजी असलेल्या मस्तवाल सत्ताधारी आणि प्रशासन यांना या प्रश्नी कसलाच कळवळा नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी उद्या मंगळवार दि 30 रोजी संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयावर आपला टाहो फोडून आक्रोश करणार असून या निमित्ताने जिल्ह्यातील शेकडो गावातील शेतकरी मोठ्या संख्येने किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले आहेत. अनेक तालुक्यातील गावागावात शेतकरी, शेत मजूर,कामगार, युवक एकत्र येत या आक्रोश मोर्च्याची तयारी करत आहेत.


राज्यात अनेक भागात खरीप पूर्ण एप्रिल-मे मधील अवकाळी आणि खरिपाच्या जुलै-ऑगस्ट मध्ये झालेली अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात राज्यात आणि जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन शेती, शेती पीक, शेती अवजारे, पशुधन यांची मोठी हानी झाली. पिढ्यानपिढ्या भरपाई होणार नाही असे शेतीचे नुकसान झाले असून सरकारने सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी न करता जुलै-ऑगस्ट मधील नुकसानीची केलेली 2 हजार 200 कोटी मदत देणारे आमचे सरकार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. जिल्ह्यात सप्टेंबर अखेर झालेल्या अतिवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे आलेला पूर यामुळे लाखो हेक्टरवरील पिकासह अक्षरशः शेती वाहून गेलेली असताना सत्ताधारी मंडळी फक्त पाहणी दौरा करत आहेत. सरसगट कर्ज माफी करून बाधित क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ सर्वोतोपरी मदत विनाविलंब शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणीकरिता मराठवाड्यातील शेतकरी, शेत मजूर, कामगार हजारोंच्या संख्येने संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयावर धडकून आपला आक्रोश सरकार समोर व्यक्त करणार आहेत. या आक्रोश मोर्च्याची गावोगावी जय्यत तयारी सुरू असून शेतकरी, शेतमजूर यांच्यासह युवक, विद्यार्थी देखील आता सरकारच्या उदासीन भूमीविरोधात पेटून उठले आहेत. मंगळवार दि 30 रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्च्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकजुट झाली असून मस्तवाल सरकारचे डोके जागेवर आणण्यासाठी हा आक्रोश मोर्चा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !