परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

रामराव ढोक महाराजांची राम कथा...

घटस्थापनेने होणार श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ




विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

रामराव ढोक महाराजांची राम कथा

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास सोमवारी (दि.२२) घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. याची जय्यत तयारी योगेश्वरीच्या मंदिरात सुरू आहे. या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत .

         योगेश्वरी देवीचा हा नवरात्र उत्सव दसरा महोत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात देवीच्या प्रत्येक माळेला विधिवत पूजन व आरती होते. मंदिर परिसरात भजन, कीर्तन, प्रवचन, गायन, वादन शारदोत्सव असे विविध कार्यक्रम होतात. 

          सोमवारी सकाळी १० वाजता घटस्थापनेने या दसरा महोत्सवाला प्रारंभ होतील. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात देवीची शासकीय पूजा होईल. मंदिराच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात दररोज दुपारी १२ ते सायंकाळी सहा यावेळेत विविध महिला भजनी मंडळांच्या भजनाचे कार्यक्रम होतील. सायंकाळी सहाच्या नंतर गायन व कीर्तनाचे कार्यक्रम होतील. या कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. याच मंडपात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन व किर्तन होणार आहे. 

रामकथा...

          बुधवारपासून (दि.२४) ते सोमवार (दि.२९) पर्यंत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज हे रामकथा सांगणार आहेत. या रामकथेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, सचिव गिरधारीलाल भराडिया, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, पूजा कुलकर्णी यांच्यासह सर्व विश्वस्तांनी केले आहे. 

संगीत व गायन

          सोमवारी (दि.२२) सायंकाळी ६ ते ७ यावेळेत मुंबईच्या असावरी देगलुरकर यांचे गायन होईल. रात्री ८ ते १० यावेळेत पुण्यातील रेवा नातु यांचे गायन होणार आहे.मंगळवारी (दि.२३) सायंकाळी ७ वाजता मुंबईच्या भाग्यश्री पाटील व ८.३० वाजता भाग्यश्री टिकले यांचे गायन होणार आहे. बुधवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजता लातूर येथील वृषाली कोरडे यांचे गायन, ६ वाजता पुणे येथील जयंत केजकर यांचे गायन होईल. गुरुवारी (दि.२५) दुपारी ४ वाजता स्थानिक कलावंताचे गायन, सायंकाळी ६ वाजता पांडूरंग देशपांडे व सरोजिनी देशपांडे यांचे गायन होईल. रविवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजता शिवकुमार मोहेकर यांचा 'जगदंबेचा गोंधळ' व जगविख्यात पखवाज वादक पंडित उध्दव आपेगावकर यांचे पखवाज वादन होईल. सोमवारी (दि.२९) दुपारी १ वाजता प्रा. रमेश सरवदे यांचा स्वरांजली, ४ वाजता अजय सुगांवकर यांचे गायन, ५ वाजता पुणे येथील शुभदा देशपांडे यांचे गायन होईल. बुधवारी (दि.१) नवमीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता प्रकाश बोरगावकर प्रस्तुत 'जागर योगेश्वरी मातेचा' हा गायनाचा कार्यक्रम होईल. रात्री ७.३० पंचमवेद प्रतिष्ठानचे डाॅ.विनोद निकम व अनुराधा निकम यांचा नृत्यभक्ती हा भरतनाट्यम चा कार्यक्रम होईल. या उत्सवात किसन महाराज पवार, अंबादास महाराज चिक्षे यांचे किर्तन होणार आहे.

होमहवन व पूर्णाहुती 


        मंगळवारी (दि.३०) आष्टमीनिमित्त दुपारी २ वाजता मंदिराच्या मुख्य यज्ञ  सभामंडपात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात होम हवन होईल. सायंकाळी ६.१५ वाजता पूर्णाहुती पडेल. या पूर्णाहुतीनंतर शासकीय पूजेनिमित्त सायंकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत सार्वजनिक दर्शन बंद राहाणार आहे. याची भाविकांनी नोंद घ्यावी.

सिमोल्लंघन 


        गुरुवारी (दि.२) दसऱ्यानिमित्त दुपारी १२.१५ वाजता योगेश्वरीची पालखी मिरवणूक सिमोल्लंघनासाठी निघणार आहे.  शहरातील मंडीबाजार, खोलेश्वर मंदिर, रविवारपेठ, खडकपूरा, परळीवेस, अण्णाभाऊ साठे चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, सायगाव नाका, जुना पंप, मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवारपेठ मार्ग मंदिरात पालखी मिरवणूक विसर्जित होईल. 

---

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!