परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
बीड–परळी रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास गती द्या – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित विभागांना भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड–अहिल्यानगर दरम्यान रेल्वे गाडी सुरू होणार असून त्यानंतर बीड–परळी वैजनाथ मार्गाची कामेही वेगाने होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत भूसंपादनातील अडथळे तातडीने दूर करण्यावर भर देण्यात आला. उपविभागीय अधिकारी कविता जाधव, सहायक कार्यकारी अभियंता मुकुंद पु. नाईक, वरिष्ठ अभियंता सुरेश कुमार मंडल आदी अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, वसीमा शेख व गौरव इंगोले यांनी सहभाग घेतला.
जॉन्सन यांनी सांगितले की, प्रलंबित भूसंपादन प्रकरणे समन्वय साधून निकाली काढावी व आवश्यक जमीन लवकर उपलब्ध करून द्यावी. राष्ट्रीय राज्यमार्ग विभागाने ब्रम्हवाडी येथील उड्डाणपूलाचे काम त्वरीत सुरू करावे, असेही त्यांनी नमूद केले. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी बीड रेल्वे स्थानकाला भेट देत येथील सुविधांची पाहणी केली. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बीड–परळी रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजनाचे निर्देश दिले. यावेळी परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपमुख्य अभियंता डी. डी. लोळगे, कार्यकारी अभियंता लोकेंद्र कुमार सिंग, वरिष्ठ अभियंता एल. पी. नायक, अमरकुमार अकेला व सुरेश कुमार मंडल उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा