इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी- पंकजा मुंडे

जालना आणि बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती: नागरिकांनी सतर्क राहण्याचे पंकजा मुंडे यांचे आवाहन

काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी- पंकजा मुंडे

मुंबई | प्रतिनिधी

         जालना आणि बीड जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या, नाले आणि कालवे भरून वाहत असुन अनेक ठिकाणी पाणी रस्त्यांवर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काळजी करु नका, आपत्तीसदृश परिस्थितीत शासन आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना पालकमंत्री  पंकजाताई मुंडे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाशी सातत्यानं संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून मदतकार्य तत्काळ राबविण्याचे निर्देशही दिले आहेत.

नागरिकांनी घ्यावी काळजी......

-----------------------

    पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, "या आपत्तीसदृश परिस्थितीत शेतकरी बांधव आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. ज्या भागांत रस्ते बंद आहेत, तेथून प्रवास करू नये. पूरग्रस्त भागांपासून लांब राहावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन सज्ज असून, बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा देण्यात येत आहे. तसेच नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून शासकीय मदत पुरविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातील आष्टी,परळी, शिरूर व अन्य तालुक्यांतील गंभीर पूरस्थिती लक्षात घेता तिथल्या प्रशासनाशीही संपर्क सुरू असून आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली जात आहे.

काळजी करु नका, शासन पाठीशी

------------------

      या नैसर्गिक संकटाचा धीराने सामना करावा. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. शासन तुमच्या पाठीशी ठाम उभं आहे असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!