परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

 घटस्थापनेने श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ




घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी 

अंबाजोगाई - महाराष्ट्राचे शक्तीपीठ  व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास सोमवारी व सकाळी १० वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी सौ. अश्विनी जिरगे(सोनवणे), श्री.हरिश्चंद्र सोनवणे यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत  श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. सोमवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला.अप्पर जिल्हाधिकारी सौ. अश्विनी जिरगे(सोनवणे),श्री. हरिश्चंद्र सोनवणे यांनी  श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. 

या महापुजेसाठी

योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा,सचिव गिरधारीलाल भराडीया, सहसचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष सौ.पूजा राम कुलकर्णी, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, विश्वस्त आ.नमिता मुंदडा,राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे,भगवानराव शिंदे,ॲड.शरद लोमटे,श्रीराम देशपांडे,विश्वस्त तथा मुख्य पुजारी सारंग पुजारी,सौ.गौरी जोशी, संजय भोसले, हंसराज देशमुख,शिरीष पांडे, प्रवीण दामा, राजन पुजारी

यांच्यासह पुरोहित,  मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणाऱ्या  भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

------ 

 स्वखर्चाने आमदारांनी करून दिली सिमेंटगच्ची: 

        श्री. योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी पाहणी करण्यासाठी आ.नमिता मुंदडा मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी त्यांना मोकळ्या जागेवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निर्शनास आले. त्यांनी या परिसरात रात्रीतून सिमेंटची गच्ची तयार करून देत भक्तांची गैरसोय दूर केली.

------ 

विविध उपक्रमांची रेलचेल:

                 श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने रविवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन आदि उपक्रम सुरू झाले आहेत. या सर्व उपक्रमांना भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

-------

ढोक महाराजांची रामकथा: 


           श्री.योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने २४ नोव्हेंबर बुधवार पासून ते २९ नोव्हेंबर सोमवार  पर्यंत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज हे रामकथा सांगणार आहेत. या रामकथेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, सचिव गिरधारीलाल भराडिया, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, पूजा कुलकर्णी यांच्यासह सर्व विश्वस्तांनी केले आहे. 

----

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!