इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

वसतिगृहात राहत असलेल्या १३ वर्षाच्या शाळकरी मुलाचे अपहरण 




केज :- केज येथे एका गुरुकुल वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला १३ वर्षीय मुलगा वस्तीगृहातून बाहेर पडल्यानंतर त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज शहरात १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. 

      

माजलगाव तालुक्यातील माली पारगाव येथील रोहित विजय चव्हाण वय (१३ वर्ष) हा केज शहरातील रामराव पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर तो शहरात तांबवेश्वर मुलांचे गुरुकुल वस्तीगृहात वास्तव्यास होता. मागील आठवड्यात तो गावाकडे गेल्या नंतर परत वसतिगृहात जाण्यास नकार देऊ लागल्याने त्याचे वडील विजय चव्हाण व आई संगीता चव्हाण हे त्याला तुळजापुरला दर्शनासाठी घेऊन गेले. त्या नंतर परत जाताना १८ सप्टेंबर रोजी ४.३० वाजता या वस्तीगृहावर सोडून गेले. सायंकाळी ६.३० वाजता रोहित चव्हाण हा कोणाला न सांगता वस्तीगृहातून बाहेर पडला. तो परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्याचा तपास न लागल्याने त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार विजय चव्हाण यांनी केज ठाण्यात दिल्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे करीत आहेत. 

दरम्यान, या पूर्वी तो मुलगा मागे दोन - तीन वेळा असा पळून गेल्याने व तो वसतिगृहात राहत नसल्याने त्याच्या वडिलांनी हमीपत्र देऊन त्याला सोडले होते. त्याचा रंग सावळा असून अंगाने सडपातळ आहे. उंची तीन फुट आठ इंच असून अंगावर पांढऱ्या व काळ्या रंगाचे मोठे चेक्स असलेले शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे. अशा वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास केज ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!